काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीर सभेसाठी वाहनाची गर्दी झाल्याने दर्यापूर ते अकोट दरम्यान सुमारे १० किलो मीटर वाहतूक कोंडी झाली.विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेकडो वाहने शेगावच्या दिशेने जात होती.
हेही वाचा >>>राहुल गांधींसह हजारो पदयात्री जिल्ह्यात दाखल; वरखेड येथे तिरंगा व भगव्याचा मेळ! रिंगण सोहळ्यात रमले राहुल गांधी
दर्यापूर ते अकोट दरम्यान काही बसगाड्या अल्पोपहार साठी थांबवण्यात आल्या. त्यामुळे मागील गाड्या पुढे जाऊ शकत नव्हत्या. हे बघून अनेकांनी वाहने वळवली, परिणामी वाहतूक कोंडी झाली. हा एकपदरी मार्ग असल्याने वाहतूक सुमारे पाऊण तास थांबली होती. येथून शेगाव ५० ते ५५ किलो मीटर असल्याने सभा स्थळ गाठण्यास विलंब झाला.