उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था आणि नेहमीच होणारी वाहतूक कोंडी बघता नागपुरात वाहतूक पोलीस कार्यरत आहेत की नाही? अशी शंका नागपूरकरांना येते. पोलीस फक्त व्हीआयपी शहरात आल्यानंतर रस्त्यावर काम करताना दिसतात. परंतु , शहरात जर कोणी व्हीआयपी नसल्यास वाहतूक पोलीस शांत बसतात. सर्वसामान्यांप्रती वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधणारे फलक शहरातील अलंकार टॉकीज चौक ते व्हीआयपी मार्गावर लागले आहेत.
हेही वाचा – नागपुर : भाजपच्या मंत्र्यांची संघ पदाधिका-यांसोबत महत्वाची बैठक सुरू
“तुम्हाला माहित आहे का?, नागपूर पोलीस फक्त शहरात राजकीय पुढारी आल्यासच तत्पर असतात अन्य दिवशी मात्र शहरातील वाहतूक रामभरोसे असते. ” असे या फलकावर लिहिले आहे. या फलकांनी अनेक नागपूरकररांचे लक्ष वेधले असून पोलिसांची प्रतिमा मली