लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने रस्त्यावर ‘स्टंटबाजी’, ‘रेसिंग’ आणि फटाके फोडून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या दीडशेवर बुलेटचालकांना वाहतूक पोलिसांनी पद्धतशीर ‘फटाके’ लावले आहे. सदर वाहतूक पोलिसांनी एकाच दिवसांत दीडशेपैकी ८० बुलेटवर कारवाई करीत विक्रम निर्माण केला आहे.

प्रजासत्ताक दिनाला रस्त्यावर बुलेटने स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. त्यामुळे बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठमोठ्याने फट्ट असा आवाज करीत रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम राबविली. उपायुक्त शशिकांत सातव यांनी बुलेट सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल १५० वर बुलेटस्वारांवर कारवाई केली. त्यात सदर वाहतूकचे प्रभारी अधिकारी प्रशांत अन्नछत्रे यांनी तब्बल ८० पेक्षा जास्त बुलेटवर कारवाई करीत सायलेन्सर काढून चालकांना ‘फटाके’ लावले.

आणखी वाचा-मुलीने अर्धनग्नावस्थेत जंगलातून काढला पळ… बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक

विशेष म्हणजे सायलेन्सर प्रकरणी बुलेट चालकांवर दोन वेळेस कारवाई झालेली असेल, तर आता यापुढे सायलेंसर बदलून देणाऱ्या गॅरेज चालक, मालकाला सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. सदरच्या वाहतूक कार्यालयात फटाके मारणारे सायलेंन्सर काढून दंड वसूल केल्यानंतरच बुलेट सोडण्याची कारवाई दिवसभर सुरु होती.

Story img Loader