नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातीस अर्धेअधिक वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे त्याचा सामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून ही समस्या सोडवण्याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून चौकात सिग्नल लावण्यात आले. मधल्या काळात झालेल्या अतिपावसामुळे अनेक ठिकाणी ही यंत्रणा नादुरुस्त झाली. त्यातील काही दुरुस्त करण्यात आले. पण, गेल्या काही दिवसांपासून अनेक सिग्नल बंद पडले. यात वर्दळीच्या चौकांतील सिग्नलचा समावेश आहे. यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. अशातच सिग्नल बंद असल्याने वाहतूक अनियंत्रित होत असल्याचे चित्र आहे.
नागपूर शहरातील वाहतूक सिग्नल बंद ; वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांची होतेय गैरसोय
सिग्नल बंद असल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून ही समस्या सोडवण्याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-10-2022 at 09:24 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic signal off problem for peoples in nagpur city tmb 01