गडचिरोली : झटपट श्रीमंत होण्याचा नादात गुप्तधनासाठी दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले. निताई दास, हृदय बाला अशी आरोपींची नावे असून दोघेही चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपूर येथील रहिवासी आहेत. आरोपींना अटक करून न्यायालयात हजार केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी तर एकाची सुटका करण्यात आली.
चामोर्शी श्रीनिवासपूर येथे काही दिवसांपूर्वी आरोपींनी गुप्तधनाच्या लालसेने दुर्मीळ असे खवल्या मांजर पकडून ठेवले होते. कुणालाही संशय येऊ नये म्हणून या मांजराला जंगलातच बांधून ठेवण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कुणकुण लागताच सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली व खवल्या मांजर ताब्यात घेतले.
हेही वाचा >>>शोधा बघू! लोभस ‘ गोसावी ‘ हरवलाय कुठे?
गुप्तधन आणि अंधश्रद्धेपोटी आजही खवल्या मांजराची तस्करी करण्यात येते. त्यामुळे बाजारात या मांजराची किंमत ३० ते ४० लाखात असल्याचे बोलल्या जाते. परंतु दुर्मिळ श्रेणीत येत असल्याने या प्राण्यांच्या वाहतुकीवर बंदी आहे.