गोंदिया : भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात अन्य नुकसान झाले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सोमवारी सकाळी खासदार मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबीर व जनता दरबारला उपस्थित राहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या दिशेने जात असताना महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान दोन ट्रेलर चालकांचे भांडण झाले. खासदारांच्या ताफ्यातील इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच.३६, झेड ७७७० च्या मागे असलेल्या ट्रेलर चालकाला दुसऱ्या ट्रकचालकाने गाडीखाली ओढले. यामुळे गेअरमध्ये असलेला ट्रक खासदारांच्या ताफ्यातील वाहनाला घासत गेला.

हेही वाचा – वृक्षतोड व पर्यावरणीय समस्येवर आदित्य ठाकरे घेणार नागपुरात परिषद

या अपघातात सुदैवाने वाहनला फक्त खरचटले. यावेळी खासदार सुनील मेंढे हे त्यांच्या ताफ्यातील दुसऱ्या गाडीत होते, अशी माहिती खासदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer directly hit the mp vehicle in gondia district sar 75 ssb