नागपूर : भारतीय रेल्वेने भारताची समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशातील आणि विदेशातील लोकांना कळावा म्हणून भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडी सुरू केली आहे. ही गाडी मध्यप्रदेशातून निघणार आहे आणि दक्षिण भारतातील पर्यटनस्थळांना भेटी देणार आहे.
इंडियन रेलवे कॅटरिंग अँड टूरिझम कर्पोरेशन लिमिटेडतर्फे (आईआरसीटीसी) ही भारत गौरव पर्यटक ट्रेन चालवण्यात येत आहे. ही गाडी २९ नोव्हेंबर २०२३ ला इंदूर येथून “श्री रामेश्वरम, तिरुपती दक्षिण दर्शन यात्रेकरिता निघेल. ही गाडी इंदूर, देवास, उज्जैन, शुजालपुर, सीहोर, रानी कमलापति, इटारसी आणि नागपूरमार्गे जाईल. या गाडीने होणारे पर्यटन १० रात्री आणि ११ दिवसांचे आहे. मल्लिकार्जून, तिरुपती, रामेश्वरम, मदुरई आणि कन्याकुमारी येथील पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जातील. या पर्यटनासाठी १८ हजार ५०० रुपये प्रति व्यक्ती (स्लीपर क्लास), २९ हजार ५०० रुपये प्रति व्यक्ती (एसी थ्री टिअर) आणि ३९ हजार ६०० रुपये प्रति व्यक्ति (एसी टू टिअर) खर्च पडणार आहे.