केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेमार्फत यावरील संशोधन आणि तंत्रज्ञनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता गेल्या नऊ वर्षांपासून तंत्रज्ञान अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत शेतकरी आणि कृषी विस्तार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार लिंबुवर्गीय फळांची रोपे पुरवण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे प्रशिक्षण मिळाले पण रोपे कुठाय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरातील केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेत संत्री, मोसंबी आणि निंनागपुरातील केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेत संत्री, मोसंबी आणि निंबूया फळांमध्ये संशोधन केले जाते. बूया फळांमध्ये संशोधन केले जाते. या फळांधून चवदार, सुगंधी आणि अधिक रसदार फळे तयार करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. तसेच बियाविरहित संत्री असेही एक वाण शोधून काढण्यात आले आहे. याशिवाय रोगरहित आणि जास्तीत जास्त काळ उत्पादन देऊ शकतील, अशी रोपे तयार करण्यात येत आहेत. या संशोधन केंद्राला जोडून लिंबुवर्गीय फळावरील तंत्रज्ञान अभियानला २००७ पासून सुरुवात केली आहे. संशोधन संस्थेचे संचालक हे या अभियानाचे प्रमुख आहेत.

सीआरआयसी ही संस्था मात्र आपल्या मर्यादांमुळे देशातील शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे लिंबुवर्गीय फळांची रोपे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. देशात दरवर्षी सुमारे २५ लाख रोपांची (संत्री, मोसंबी, लिंबू) आवश्यकता आहे. संस्थेची क्षमता दोन लाख रोपे पुरवण्याची आहे. संस्थेचे रोपे पुरवण्याचे काम नाही, परंतु इतर वेगवेगळ्या राज्यातील रोपवाटिकांना रोगरहित रोपे तयार करण्याचे तंत्रज्ञान देण्यास पुढाकार घेतल्यास हे शक्य होऊ शकेल. त्यासाठी तंत्रज्ञान अभियानात रोपवाटिका या मुद्दय़ांचाही समावेश होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

राजस्थानी संत्रा नागपुरात

राजस्थानमध्ये निलगायमुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतातील पीक आणि इतर फळझाडे या गाई खातात. परंतु संत्र्याचे झाड खात नाहीत. त्यामुळे येथील शेतकरी मोठय़ा प्रमाणात संत्रा उत्पादनाकडे वळला आहे. गेल्या काही वर्षांत राजस्थानमधील संत्री दिल्ली आणि नागपूरच्या बाजारात देखील येऊ लागली आहेत.

दरवर्षी २५ लाख रोपे हवीत

देशात लिंबुवर्गीय फळांचे उत्पादन घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षी सुमारे २५ लाख रोपांची मागणी आहे. गेल्यावर्षी सीआरआयसीने संत्र्यांची ५० हजार, लिंबूची दीड लाख आणि मोसंबीचे पाच हजार रोपे उपलब्ध करून दिली आहेत.

महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात लिंबुवर्गीय फळांच्या सुमारे ४०० खासगी रोपवाटिका आहेत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची गरज भागवली जाते. परंतु खासगी रोपवाटिकाधारक निरोगी रोपे तयार करण्यासाठीचे निकष पाळत नाहीत. त्यामुळे फळ झाडांना रोग होतात. या झाडांचे वयोमानदेखील कमी असते. शिवाय उत्पादन कमी होते.

लिंबूच्या रोपांना सर्वाधिक मागणी

संत्र्याचे उत्पादन महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणात येते. दक्षिण भारतात मोसंबीच्या पिकाला पसंती आहे. लिंबू उत्पादन मात्र देशभर घेतले जाते. राज्यात औरंगाबाद, जळगाव, परभणी, अकोला, यवतमाळ या जिल्ह्य़ात लिंबूचे उत्पादन घेतले जाते. संत्र्याचे उत्पादन अमरावती, नागपूर आणि छिंदवाडा जिल्ह्य़ात सर्वाधिक घेतले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान अभियान

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता २००७ मध्ये तंत्रज्ञान अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत विदर्भ, मराठवाडा आणि छिंदवाडा येथील शेतकरी तसेच कृषी विस्तार अधिकारी यांना तंत्रज्ञानाबद्दल शिक्षित केले जाते. तसेच प्रशिक्षण दिले जाते. रोपे लावण्यासाठी खड्डे किती खोल असावे. रोपाची निगा कशी घ्यावी आणि संत्र्यावर येणाऱ्या रोग डिंक्याच्या प्रादुर्भावापासून झांडांना सुरक्षित ठेवण्याबद्दलचे मार्गदर्शन केले जाते. गेल्या दहा वर्षांमध्ये ४२ हजार शेतकरी, विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण दिल्याचा दावा संस्थेने केला आहे.

रोपटय़ांची मोठी मागणी आहे. अधिकाधिक रोपवाटिकांमध्ये चांगल्या प्रतीची रोपे तयार व्हावीत म्हणून लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेकडून चर्चासत्र आयोजित केली जातात. ही संस्था तांत्रिक मार्गदर्शन देत असते. परंतु रोपटे तयार करण्यासाठी या संस्थेचा शासकीय किंवा निमशासकीय रोपवाटिकासोबत करार नाही.

सुनील शिंदे, लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळाचे माजी सदस्य.