अकोला : मध्य रेल्वेच्या सांगली – मिरज स्थानकादरम्यान २६ डिसेंबर ते ५ जानेवारी दुहेरीकरण व ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कामामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत. या तांत्रिक कामामुळे एकूण ३४ गाड्या प्रभावित झाला आहेत. यात अकोला मार्ग धावणाऱ्या दोन रेल्वेचा समावेश आहे.११४०३ नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस २६ डिसेंबर रोजी कुर्डूवाडी रेल्वेस्थानकापर्यंत धावेल. ११०४० गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस २५ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत पुणे स्थानकापर्यंतच धावेल. ११०३९ कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस २६ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत पुणे स्थानकापासून सुटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला, पूर्णा, लातूर, कुर्डूवाडी मार्गे धावणारी ११४०४ कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस २९ डिसेंबर, १ जानेवारी, ५ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. ११४०३ नागपूर – कोल्हापूर  एक्सप्रेस ३० डिसेंबर, २ जानेवारी, ६ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. या बदलामुळे रेल्वे प्रवाशांना चांगलाच मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.