नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इटारसी-नागपूर दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू असून त्याअंतर्गत पांढुर्णा स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि यार्डमध्ये फेरबदल करण्यात येणार आहे. त्यासाठी आमला-नागपूर आणि नागपूर-आमला मेमू रेल्वेगाड्या सात दिवस रद्द करण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी क्रमांक ०१३२४ (आमला-नागपूर) मेमू आणि गाडी क्रमांक ०२१०३ (नागपूर-आमला) मेमू २४ ते ३० मे २०२३ पर्यंत रद्द करण्यात येत आहे. तसेच गाडी क्रमांक ०१२०४ (आमला-नागपूर) मेमू आणि ०१३२३ (नागपूर-आमला) मेमू २४ ते ३० मे २०२३ दरम्यान धावणार नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trains canceled for seven days due to work on third railway line between itarsi nagpur in nagpur section of central railway rbt 74 amy