महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर: महावितरणमध्ये वर्षभरापूर्वी विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक म्हणून रूजू झालेल्यांपैकी सुमारे शंभर कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या झाल्या. परंतु, दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेले कर्मचारी आणि गंभीर आजाराने ग्रस्त कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात आहे. या बदल्यांवर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने आक्षेप घेतला आहे.

fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Youth Congress, officials expelled, Nagpur,
नागपूर : युवक काँग्रेसमध्ये काय चाललंय? आणखी चार पदाधिकारी निष्कासित
Classification of funds Rs 80 crore earmarked for construction of drainage lines and sewage treatment plants
आयुक्तांनी फिरविला शब्द, ८० कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
More than 17 deaths in two years at ammunition company
दारुगोळा कंपनीत दोन वर्षांत १७ हून अधिक बळी… भंडारातील घटनेमुळे…
pcmc issue notices to 221 major construction companies for violating environmental regulations
पिंपरी : प्रदूषण करणाऱ्या २२१ बांधकाम व्यावसायिकांना दणका; महापालिकेने केली ‘ही’ कारवाई

महावितरणमध्ये सुमारे वर्षभरापूर्वी विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक पदावर सुमारे दीड हजार कर्मचारी रूजू झाले. त्यापैकी सुमारे १०० कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या महावितरणकडून करण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांकडून आजारपणासह इतरही कारणे दिली गेली. परंतु, राज्याच्या बऱ्याच भागात विविध गंभीर आजाराने ग्रस्त कर्मचारी, पती- पत्नी एकत्रीकरणाच्या नावाने बदली मागणारे कर्मचारी, दहा वर्षे सेवा पूर्ण झाल्यावरही अनेकांच्या बदल्याच होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संतापली आहे. फेडरेशनकडून बदल्यांसाठी सुमारे ४०० कर्मचाऱ्यांची नावे महावितरणला दिली होती. त्यापूर्वी महावितरणसोबत झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून १२.५ टक्के विनंती बदल्या करण्याचे मान्य केले. परंतु, प्रत्यक्षात ४ टक्केही बदल्या केल्या नसल्याचा आरोपही फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी केला आहे.

आणखी वाचा-महिला डॉक्टर अंघोळ करताना दुसऱ्याकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग.. मेडिकलमध्ये नेमकं काय घडलं?

नियमानुसार प्रक्रिया

महावितरणमध्ये विनंती बदल्यांची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होते. त्यामुळे सर्व बदल्या नियमानुसारच झाल्या आहेत. -अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

२४ जुलैला प्रकाशगड येथे आंदोलन

महावितरणमध्ये वर्षभरापूर्वी रूजू झालेल्या शंभर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यकांच्या विविध कारणांमुळे विनंती बदल्या झाल्या. परंतु दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत, गंभीर आजाराने ग्रस्त, पती-पत्नी एकत्रीकरणाच्याही बदल्या होत नाहीत. या बदल्यांच्या घोळाबाबत २४ जुलैला मुंबईत प्रकाशगडला आंदोलन केले जाईल. त्यात कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. -कृष्णा भोयर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.

Story img Loader