नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज गुरुवारी जाहीर झाल्या. त्यात नागपुरातील ७ पोलीस उपायुक्त-अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यात झाल्या आहेत, तर नागपुरात केवळ सध्या दोनच अधिकारी देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या खोळंबल्या होत्या. परंतु आज गुरुवारी २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. नागपुरातील वरिष्ठ आयपीएस सारंग आवाड यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली. बसवराज तेली यांची सांगली अधीक्षक, नुरुल हसन यांची वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. यासोबतच नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राकेश ओला यांची अहमदनगर पोलीस अधीक्षक पदावर तर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या जागी सिंगुरी विशाल आनंद यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा : नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अडचणींमध्ये वाढ, राज्य सरकारने मागितला खुलासा
नागपूर लोहमार्गाचे एम. राजकुमार यांची जळगाव अधीक्षक पदावर तर नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्रीकांत परोपकारी यांची ठाणे आयुक्तालयात उपायुक्त पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर लक्ष्मीकांत पाटील यांची नागपुरात बदली झाली आहे.