वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहे. विरचक्र पुरस्कार प्राप्त ऑनररी कॅप्टन, नायब सुभेदार भिवसन अंभोरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्थानकात एक कोणशिला नामनिर्देशित करून लावण्यात आली आहे. आता या रेल्वे स्टेशनचे अद्ययावतीकरण प्रस्तावित आहे. या ठिकाणी पुन्हा ती कोणशिला आणि विरचक्र प्राप्त स्मृतिशेष भिवसन अंभोरे यांचा सन्मान अबाधित रहावा, अशी भूमिका माजी सैनिक आणि नातेवाईकांची आहे.
हेही वाचा – आता पालीच्या पाठीवरही खवले; तामिळनाडूत आढळली ‘ही’ पाल
हेही वाचा – ‘आययुसीएन’च्या यादीतील संकटग्रस्त गिधाड उपचारासाठी नागपुरात!
२० कोटी रूपये खर्च करून केंद्र सरकार वाशीम येथील रेल्वे स्थानकाचा कायापालट करणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास करणार आहे. यामध्ये राज्यातील १२३ स्टेशनसह वाशीम रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. नव्या इमारत आणि रेल्वे स्टेशन अद्ययावतीकरण प्रस्तावित आराखडा तयार केला आहे. परंतु विरचक्रप्राप्त महार रेजिमेंटचे नायब सुभेदार मानद कॅप्टन स्मृतिशेष भिवसन अंभोरे यांच्या कार्याचा गौरवार्थ असलेला स्मृती नामशिला परत नव्या स्वरूपात कायम ठेवावा, अशी मागणी माजी सैनिक, सैनिक कल्याण मंडळ आणि समाजातील मान्यवर मंडळी तसेच आप्तेष्ट व सामाजिक संस्था – संघटनाकडून केली जात आहे.