नागपूर : उपराजधानीत भरदिवसा तृतीयपंथींकडून गुंडागर्दी केली जात आहे. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत चार तृतीयपंथी एका वाढदिवस समारंभ असलेल्या घरात गेले. त्यांनी येथे १० हजार रुपये बक्षिसाची मागणी केली. कुटुंबीयांनी ५०० रुपये दिले असता त्यांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पूजा ऊर्फ जोया लखन वर्मा (२५), तन्नू विजय मोरे (३४), ग्लोरी संध्या मल्हारी (२२) आणि ऑटोरिक्षा चालक असे चार आरोपींची नावे आहेत. तर कुणाल जागेश्वर मेश्राम (३२) रा. चिटणीस नगर, शिवसेना चौकजवळ, नागपूर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुणाल यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यांनी घराच्या अंगणात समारंभासाठी मंडप टाकला होता. मंडप बघून एका ऑटोरिक्षातून २९ जानेवारीला सकाळी ९ ते ११ वाजतादरम्यान तीन तृतीयपंथी त्यांच्या घरात गेले. त्यांनी कुटुंबीयांना मुलीच्या वाढदिवसानिमित्त तब्बल १० हजार रुपयांचे बक्षीस मागितले. कुणाल यांनी स्वखुशीने ५०० रुपये तृतीयपंथींना दिले. परंतु, तृतीयपंथींनी कुणाल यांच्या कुटुंबीयांशी वाद घालणे सुरू केले. कुणाल यांनी १० हजार रुपये देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यावर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत थेट लाथाबुक्कीने मारहाण सुरू केली. कुणाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे.

dcm ajit pawar warning pimpri chinchwad police over liquor sale prostitution in alandi
आळंदीतील मद्यविक्री, वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Ravikant Tupkar, hunger strike,
बुलढाणा : रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; ११ सप्टेंबरला मंत्रालयात बैठक
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

हेही वाचा – नागपूर : खासदर औद्योगिक महोत्सवातील स्वच्छतागृहात महिलांचे आक्षेपार्ह चलचित्र, कला शिक्षकाने…

हेही वाचा – केंद्र-राज्यांच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत विसंगती

नागपूर पोलिसांच्या कारवाईचे काय?

नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अवैध वसुली करणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याअंतर्गत या टोळी वा एकटे तृतीयपंथी कुठल्याही कार्यक्रमात पैशाची मागणी करण्यास मनाई करण्यात आली होती. ट्रॅफिक जंक्शन, चौकात एकत्र येण्यास आणि वाहनचालक, प्रवाशांकडून पैसे मागण्यास मनाई करण्यात आली होती. आयोजकाने आमंत्रित केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. आदेशाचे उल्लंघन केल्यास नागपूर पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार होती. त्यानंतरही तृतीयपंथींकडून ही वसुली व लोकांना त्रास देणे सुरू आहे.