नागपूर : सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात सुमारे एक महिन्यापूर्वी गोंदिया वनविभागातून एक व नागपूर शहराजवळून एक असे दोन लांब चोचीचे गिधाड उपचारासाठी आणले होते. मरणासन्न अवस्थेतील या गिधाडांना वाचवण्यात केंद्राच्या चमूला यश आले आणि नुकतेच त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सिल्लारी येथील अमलतास पर्यटन संकुलात सोमवारी गिधाड मुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. प्रवीण चव्हाण, पेंच व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी सौरभ रुहेला यांनी पूर्व पेंच पिपरिया वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना गिधाड संवर्धनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांनीही मार्गदर्शन केले.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
only rs 100 crore balance left in vault of thane municipal corporation
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; दिवाळीनंतर पालिकेचे निघाले दिवाळ
migratory birds arrived at mumbai bay
विदेशी पाहुण्यांचा मुंबई खाडीकिनारी विहार

हेही वाचा >>> अमरावतीतील हवा शुद्ध, देशात प्रथम क्रमांक

कार्यशाळेनंतर नागपूरच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरद्वारे सुटका करण्यात आलेल्या दोन लांब चोचीच्या गिधाडांना पूर्व पेंच पिपरिया वनपरिक्षेत्रातील अंबाखोरी येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गिधाडांवर दीर्घकाळ नजर ठेवण्यासाठी त्यांच्या पायाला रिंग लावण्यात आली. या गिधाडांना ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातून आणण्यासाठी खास तयार केलेल्या पिंजऱ्यांचा वापर करण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी टेंभुर्णे, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. राजेश फुलसंगे, आणि पूर्व पेंच पिपरिया वन परिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सृष्टी पर्यटन मंडळ, नागपूरचे विनीत अरोरा उपस्थित होते.