वर्धा : नव्या मोटार वाहन कायद्याविरोधात वाहन चालकांनी संप पुकारल्याने गोंधळ उडाला आहे. पेट्रोल पंपांवरच्या रांगा वाढतच आहेत. काही ठिकाणी भांडणेही झाली. नागरिक मेटाकुटीला आले असताना प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेणे सुरू केले आहे.
हेही वाचा >>> लालपरीचीही चाके थांबणार! ट्रक चालकांच्या संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच पोलीस अधीक्षक नूरुल हसन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या अनुषंगाने बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पॅनिक होण्याचे कारण नाही. पुरेसा साठा आहे. त्यामुळे आज सर्वांना पेट्रोल, डिझेल मिळेल. दुपारी दोन वाजतापर्यंत संपक-यांसोबत वाटाघाटी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.