कोलकाताहून नागपूरमार्गे भारत भ्रमणावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रक्तदान चळवळ शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोलकाता येथील जगदीश राऊत याने ५ ऑक्टोबर २०१८ पासून सायकलने भारत यात्रा सुरू केली आहे. कोलकाताहून तो नागपूरमार्गे पुढे निघाला आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्याच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

जगदीशने तीन महिन्यापूर्वी सायकल यात्रा सुरू केली. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून तो महाराष्ट्रात दाखल झाला.  मुंबई, जळगाव, अमरावती असा प्रवास करीत तो  मंगळवारी सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील रक्तपेढीत आला. तेथील  रुग्णांना व इतरांना त्याने रक्ताबाबतची माहिती दिली. डॉ. संजय पराते यांच्याशी चर्चा केली.  यावेळी राऊत याचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, रक्तपेढी प्रमुख डॉ. आरती दाणी उपस्थित होते. ‘ब्लड इन नीड ’आणि आकाश झेप फाऊंडेशनतर्फेही जगदीशचे स्वागत करण्यात आले. संचालन संदीप महाकाळकर यांनी केले. आभार कमलकिशोर धर्माळे यांनी मानले.