वर्धा : समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असाल तर सावधान. तुमच्या भरधाव वेगात असलेल्या वाहनास कधीही करकचून ब्रेक लावण्याची आपत्ती तुमच्यावर ओढवू शकते. समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, अशी कामे करताना अर्ध्या किलोमीटर आधी खबरदारीचा फलक लावणे अपरिहार्य असते. तसेच रेडियमचे लुकलूकते इशारे वाहनचालकांना सावध करण्यास ठेवल्या जातात. मात्र, समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असताना यापैकी एकही सूचना नसल्यामुळे आज अनेक भरधाव वाहनांना करकचूक ब्रेक लावत, वेळेवर गती कमी करीत थांबावे लागले. वैभव काशिकर यांना असाच अनुभव आला.
हेही वाचा >>> नागपूर : नववर्षदिनी ‘समृद्धी’वर वाहने सुसाट म्हणून…
हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक! आमदार निवासात साफसफाई करताना आढळल्या दारूच्या बाटल्या..
सतर्क करणारा कोणताही फलक किंवा अन्य सावधगिरी घेण्याची सूचना नसल्यामुळे मार्गावर काम करणारी अवजड यंत्रे पाहून आम्ही चकित झालो. अनेक वाहनांना आकस्मिक ब्रेक दाबून थांबावे लागले, असे काशिकर यांनी सांगितले. मोठा गाजावाजा करीत घाईघाईत उद्घाटन करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच दुरुस्तीची कामे करताना सतर्कतेचा इशारा देणारे फलक नसणे, हा प्रकार अपघातांना आमंत्रण देणाराच आहे. यामुळे आता प्रवाशांनीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.