लोकसत्ता टीम

नागपूर : जन्मजात अपंग असलेल्या आदिवासी व दुर्गम भागातील मुलांवर नागपुरातील डॉ. विराज शिंगाडे व चमूकडून शस्त्रक्रिया व मोफत उपचार केले जातात. या कार्याची दखल घेत आलंबना फाऊंडेशनकडून अमेरिकेतील तुस्टिन, लॉस एंजेलिस येथे ९ सप्टेंबरला डॉ. शिंगाडे यांच्या गौरव केला जाणार आहे.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद

अमेरिकेतील सुमारे ५०० जणांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. सोबत डॉ. शिंगाडे यांच्या उपस्थितीत अमेरिकेतील कार्यक्रम स्थळी बालकांमधील अपंगत्वावर जनजागृतीसाठी वॉकथॉनचेही आयोजन करण्यात आले आहे. आलंबना फाऊंडेशन जगभरात विविध सामाजिक कामांना मदत करते. ९ सप्टेंबरच्या कार्यक्रमातूनही निधी उभारून त्यातून जगातील विविध संघटनांसह डॉ. विराज शिंगाडे यांच्या संस्थेत उपचार घेणाऱ्या मुलांनाही मदत केली जाणार आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! स्कूलबस चालकाचा बालिकेवर बलात्कार

याबाबत सांगताना डॉ. विराज शिंगाडे पत्रकार परिषदेत म्हणाले, त्यांच्या चमूने २०२० पासून नागपूर येथील नागाई नारायणजी मेमोरियल फाऊंडेशनच्या माध्यमातून जन्मजात अपंग असलेल्या मुलांना विविध शस्त्रक्रिया व उपचारासाठी काम सुरू केले. त्यात डॉ. रश्मी शिंगाडे, डॉ. दीपाली मंडलिक, डॉ. सुहास अंबाडे, डॉ. मनीष ढोके, डॉ. तरुण देशभ्रतार, डॉ. नितीन राठी, डॉ. प्रवीण शिंगाडे यांच्यासह बऱ्याच जणांची भूमिका महत्त्वाची आहे. संस्थेने हिंगण्याजवळ इनस्पायर ही संस्था सुरू केली असून तेथेही अपंग मुलांवर विविध पद्धतीने उपचार होतात.

३,७०० मुलांवर शस्त्रक्रिया

डॉ. विराज शिंगाडे यांच्या चमूने आजपर्यंत ३ हजार ७०० च्या जवळपास जन्मजात अपंगत्व, सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. हजारो मुलांना नि:शुल्क फिजिओथेरपीचाही लाभ दिला आहे.