नागपूर: आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (४ ऑक्टोंबर) नागपुरातील संविधान चौकात आदिवासी समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी आदिवासी महिलांनी अचानक घरकुलाच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडवल्याने तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यातील ४३ जलाशये तुडुंब, पण गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमीच
हेही वाचा – बुलढाणा: पितृपक्षासाठी ‘ती’ माहेरी आली, पती अगोदर परतला; मात्र तिला काळाने गाठले…
नागपुरातील संविधान चौकात धनगर समाजाला आदिवासी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी समाजाचे बुधवारपासून साखळी उपोषण सुरू आहे. आदिवासी मंत्री गावित यांनी बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी आंदोलकांच्या काही मागण्या मान्य केल्या. सोबतच आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली. मात्र आदिवासी मंत्री हे आंदोलन स्थळावरून बाहेर निघत असताना घरकुलाचे प्रश्न घेऊन आदिवासी महिलांनी अचानक मंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. लवकरच हा प्रश्नही निकाली काढला जाईल, असे आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले.