भंडारा : प्रसूती कळा असह्य झाल्यामुळे गर्भवती महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. डॉक्टरांनी प्रसुतीला वेळ आहे असे सांगून ‘तिला’ घरी परत पाठवले. दुसऱ्या दिवशी तिला तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्याने तुमसर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रसूती दरम्यान बाळाचा आणि मातेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली असून डॉक्टरांच्या चुकीने निष्पाप मायलेकाचा जीव गेल्याचे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोगरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या आष्टी येथील नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा गर्भातील बाळासह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री एक वाजतादरम्यान समोर आली. सुनिता दुर्गेश सोयाम (२४) रा.आष्टी ता. तुमसर, असे मृतक गरोदर आदिवासी महिलेचे नाव आहे.

सुनिता सोयाम या नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला एक दिवसाअगोदर तिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या होत्या. दरम्यान तिच्या पतीने प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतू येथील डॉक्टरांनी तिच्या प्रसुतीला वेळ आहे म्हणून घरी पाठविले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी सुनिताला प्रसुतीच्या तीव्र वेदना झाल्या त्यावेळी उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू उपचारादरम्यान गरोदर महिलेच्या गर्भातील नऊ महिन्याच्च्या बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

सदर घटनेने तुमसर तालूका हादरला आहे. समाजमन सुन्न झाले आहे. सदर गरोदर महिलेचा मृत्यू हा प्रसुती कळा येत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला असला तरी नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर कळणार आहे.

नऊ महिन्यांची होती गरोदर

सुनिता दुर्गेश सोयाम (२४) रा. आष्टी ही नऊ महिन्यांची गरोदर होती. प्रसूतीची वेळ असतांना तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. सुनिता सोयाम यांचे माहेर मध्यप्रदेश राज्यातील देवठाणा येथील आहे. एक वर्षाअगोदर तिचे लग्न आष्टी येथील दुर्गेश सोयाम यांचेशी झाले आणि ती पहिल्यांदाच गरोदर होती, अशी माहिती आहे.

पार्थिवावर स्वगावी अंत्यसंस्कार

गर्भातील नऊ महिन्याच्या बाळासह गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर महिलेचा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह मृतक महिलेच्या कुटुंबियांच्या स्वाधिन केले व सायंकाळी ५ वाजतादरम्यान तिच्या पार्थिवावर शोकमग्न वातावरणात आष्टी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.