लोकसत्ता टीम

गडचिरोली : मौशीखांब परिसरात ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींनी धान पीक तुडवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. आता मदतीसाठी शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ४८ तासांत ऑनलाइन तक्रार नोंदविणे बंधनकारक केल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे यांनी जाचक अटी, शर्थी शिथिल करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

जिल्ह्यात रानटी हत्तींनी गेल्या काही दिवसांत धुडगूस घातला आहे. आरमोरी, गडचिरोली, धानोरा तालुक्यातील पिकांचे नुकसान केले आहे. दरम्यान, आता हत्तींनी आपला मोर्चा गडचिरोली जवळील मौशीखांब, बेलगावकडे वळविला आहे. कळपावर पश्चिम बंगालची हुल्ला टीम लक्ष ठेवून आहे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या भागात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मज्जाव आहे, पण रात्री-अपरात्री हत्ती धानपिकांचे नुकसान करतात. मौशीखांबला शेतकरी चिंतामण कुरूडकार, नीलकंठ कुरूडकार, धुमदास आडबैले, तुकाराम कुकुडकर, अनिल राऊत यांच्या धानपिकांचे १५ नोव्हेंबर रोजी हत्तींनी मोठे नुकसान केले. तथापि, ४८ तास उलटूनही ऑनलाइन तक्रार न केल्याने शेतकरी मदतीविना राहण्याची शक्यता आहे. यावर युवक काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

आणखी वाचा-“जरांगे पाटील, भुजबळांनी शब्‍दांना आवर घालावा”, बच्‍चू कडूंचा सबुरीचा सल्‍ला

बांधावर जाऊन पाहणी

युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे व इतरांनी मौशीखांब येथे नुकसान झालेल्या शेतात जाऊन पाहणी केली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची कोणीही हमी घेत नाही. काँग्रेस मात्र वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज असल्याचा इशारा विश्वजित कोवासे यांनी दिला आहे.