यवतमाळ : ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रक खाली आली. परंतु दुचाकी चालकाने समयसूचकता दाखवून चक्क मृत्यूला माघारी पाठवले. या घटनेची चित्तथरारक चित्रफीत गुरूवारपासून समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे. काळजाचा ठोका चुकविणारा हा अपघात नागपूर-तुळजापूर महामार्गावर महागाव तालुक्यात घडला आहे.

महागाव तालुक्यातील काऊरवाडी येथील विलास पाटील वळसे हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून घराकडे परत निघाले. दरम्यान महामार्गावर त्यांच्या मागाहून येणाऱ्या ट्रकच्या समोरच्या चाकात त्यांची दुचाकी आली. झालेल्या अपघाताने विलास पाटील वळसे हे काही क्षण हादरले. अपघात होताच ट्रकचालक दुचाकीस फरफटत नेत असताना समयसूचकता दाखवून ते ट्रकच्या बफरवील स्टील दांड्याला पकडून चक्क बोनेटवर चढले. जीव मुठीत घेऊन काही क्षण ते ओरडत राहिले. मात्र मद्यधुंद ट्रकचालकाने निष्ठूरपणे जवळपास अर्धा किलोमीटर ट्रक पळविला. ट्रक समोरील एका कारमधील प्रवाशाने कारच्या मागील बाजूने हा चित्तथरारक प्रसंग टिपला.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
two wheeler driver died in Akola on Tuesday after his throat was cut by nylon manja
नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
woman doctor riding bike dies in truck collision accident on katraj handewadi road
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू ; कात्रज- हांडेवाडी रस्त्यावर अपघात

हे ही वाचा…चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……

तीच चित्रफित सर्वत्र पसरली. रस्त्यावरून ये – जा करणारे वाहनचालक हे दृश्य पाहून जागच्या जागीच थांबले. अनेकांनी ट्रक चालकाला आवाज देवून थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही ट्रकचालकाने दुचाकी फरफटत नेली. अखेर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून उडी मारून चालक पळून गेला. ट्रक थांबताच विलास पाटील वळसे यांनी बफरवरून खाली उतरून पहिले व ट्रक थांबविणाऱ्या लोकांचे आभार मानले. या अपघातात त्यांना थोडीफार इजा झाली. त्यांनी समयसूचकता व धाडस दाखवले नसते तर त्यांच्या दुचाकीसोबतच ट्रकचालकाने त्यांनाही फरफटत नेले असते. मात्र काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. विलास पाटील यांच्या धाडसापुढे मृत्यूनेही नमते घेतले, असे उद्गार उपस्थितांनी काढले. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली.

हे ही वाचा…नागपूर : रोगमुक्तीनंतरही मुक्काम खाटेवरच ,शासकीय रुग्णालयात ……

नागपूर –तुळजापूर महामार्गावर कुठेही मद्यधुंद वाहनचालकांची तपासणी होत नसल्याने मोठ्या वाहनांचे चालक मद्य प्राशन करूनच वाहन चालवित असल्याच्या तक्रारी अनेकदा होतात. मात्र पोलीस व उप प्रादेशिक परिवहन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकाराच्या घटना घडत आहे. याच मार्गावर काही महिन्यांपूर्वी एक मद्यधुंद ट्रक चालकाने वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर वाहन नेले होते. यात एक कर्मचारी ठार झाला होता. तरीही या मार्गावर मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई होत नसल्याने इतर वाहनचालक व पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे.

Story img Loader