लोकसत्ता टीम

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने काही नियम व अटींसह पावसाळ्यातही काही भागात पर्यटनाची परवानगी व्याघ्रप्रकल्पाला दिली. प्रामुख्याने व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या नियम व अटी धुडकावून लावत सर्रासपणे व्याघ्रपर्यटन केले जात असल्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. या अनियंत्रित पर्यटनाचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असताना प्राधिकरणाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातला असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात पर्यटकांची जिप्सी चिखलात अडकली असून या जिप्सीच्या सभोवताल वाघ फेरी मारत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा जगभरातील व्याघ्रप्रेमींसाठी एक आवडते ठिकाण आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : पर्यटकांच्या खिशाला कात्री! ताडोबा व्याघ्र सफारी व पर्यटन महागले…

विविध क्षेत्रातील ‘सेलिब्रिटी’ या व्याघ्रप्रकल्पात आवर्जून येतात आणि इथले वाघही जणू आपले कर्तव्य समजून त्यांना मनसोक्त दर्शन देतात. पण, हे काय ? तो मुका जीव काहीच बोलत नाही म्हणून त्याच्याच अधिवासात शिरून त्याला किती त्रास द्यायचा ? पावसाळा हा त्यांचा हंगाम, किमान त्यांना या हंगामात तरी त्यांच्या अधिवासात शांत बसू द्या. पण, कसले काय ?

पर्यटनातून महसूलात घसघशीत भर पडते आहे ना! म्हणून मग पावसाळ्यातही पर्यटन. बरे, हे पर्यटन बफर क्षेत्रात केले जात असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत की नाही ? तर या मर्यादा देखील ओलांडल्या जात आहे. पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांवर जिप्सी फसते हे ठाऊक असूनही ‘पैसे दिले तर वाघ पाहूनच जाणार’ या अविर्भावात चक्क जिप्सी या कच्चा रस्त्यावर न्यायची. मग, तो वाघ त्याचा मार्ग शोधण्यासाठी त्या जिप्सीच्या सभोवताल फेऱ्या मारतो. या व्हिडिओतही नेमके हेच दिसून येत आहे. रामदेगी परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. जिप्सी त्या चिखलात फसली आणि तिची हालचालही होत नाही.

आणखी वाचा-Gondia crime update : चुलबंद जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

तेवढ्यात त्या जिप्सीजवळ वाघ आलेला आहे. त्यातही पर्यटकांचे शुटींग सुरूच आहे. मात्र, अशावेळी वाघाने जिप्सीवर हल्ला केला आणि त्यात पर्यटकांचा बळी गेला तर काय ? अशावेळी शिक्षा त्या पर्यटकांना किंवा ते पर्यटन घडवून आणणाऱ्यांना होणार नाही, तर त्या वाघाला ‘मॅनइटर’ची उपाधी बहाल करुन त्याला जेरबंद करुन कायमचे बंदिवासात पाठवण्यात येईल. वाघाच्या भरवश्यावर पर्यटन करताना वाघाच्या सुरक्षेसह स्वत:चीही सुरक्षा धोक्यात घालण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.