वाशीम : विमुक्त जमाती मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बनावट जात पडताळणी च्या आधारे घुसखोरी सुरू आहे. यामुळे मूळ विमुक्त जमाती तील १४ जातीच्या गरीब विध्यार्थ्यांच्या मेडिकल, इंजिनीरिंग, महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत भरल्या जाणाऱ्या जागा तसेच शिक्षक, ग्रामसेवक, पोलीस, पटवारी आदी नोकऱ्यांमध्ये अन्याय होत असून या विरोधात वाशीम जिल्ह्यातील गहुली ते दिल्ली बंजारा लदेणी यात्रा काढण्यात येणार आहे.

बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्या जातपडताळणी अधिकारी व लाभार्थी यांच्यावर कडक कार्यवाही करावी,यासाठी आमदार राजेश राठोड यांनी  विधानपरिषदेच्या सभागृहात आवाज उठवला व एस आय टी चौकशी नेमण्यात सरकारला भाग पाडले होते. त्या अनुषंगाने  वाशीम येथील शासकीय विश्रामगृहात नॅशनल सेवा डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने विदर्भातील प्रख्यात मूळव्याध तज्ज्ञ डॉ. सुभाष राठोड व हृदय रोग तज्ज्ञ डॉ टी. सी. राठोड  यांनी आमदार राजेश राठोड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर

हेही वाचा >>> अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे ‘तेज’ असे नामकरण; कसा असेल दोन्ही चक्रीवादळाचा प्रवास जाणून घ्या…

यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या गहुली येथील पुतळ्याचे दर्शन घेऊन या लदेणी यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेचा दिल्लीत समारोप होणार आहे. या बैठकीचे आयोजन वाशीम तांड्याचे नायक दिलीप जाधव,कारभारी सुरेश राठोड,डॉ विजय जाधव व डॉ विपीन राठोड यांनी केले होते. यावेळी शेखर महाराज,राधेश्याम आडे,मिलिंद पवार, सुभाष तंवर,ऍडव्होकेट आकाश जाधव,कांतीलाल नाईक, राजेश राठोड,आत्माराम जाधव, विश्वनाथ राठोड,अशोक राठोड,प्रकाश राठोड,निलेश राठोड,अविनाश चव्हाण,डॉ सचिन पवार, प्रा अनिल राठोड, प्रा विलास राठोड, प्रा श्याम राठोड,प्रा गणेश चव्हाण,नेमीचंद महाराज,शंकर आडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.