वाशिम: रिसोड तालुक्यातील येवती येथील शासकीय जमिनीवर गावातील महिला मंडळ दर पंधरा दिवसांनी श्रमदान करतात. ओसाड पडलेल्या जमिनीवर लोकसहभागातून सुंदर गार्डन उभे राहत असून तेथे तुकाराम धाम साकारण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येवती गावात मोठ्या प्रमाणावर ई क्लास जमिनी आहे. मात्र या ओसाड जमिनीचा ग्रामस्थांना उपयोग व्हावा, यासाठी चार एकर जागा जिजाऊ सृष्टी व तुकाराम धाम साठी उपलब्ध झाली. येथे दर पंधरा दिवसांनी गावातील महिला मंडळ एकत्र येऊन स्वच्छ्ता करतात. आता या ओसाड जागेवर सुंदर बगीचा उदयाला आला असून यामध्ये गावातील सर्व धर्मीय महिलांचा सहभाग चर्चेत असून गावातील अनोख्या उपक्रमाची चांगलीच चर्चा रंगत आहे.

हेही वाचा… प्रेयसीला तिचा पहिला प्रियकर द्यायचा त्रास, दुसऱ्या प्रियकराची सटकली अन्…

एकीकडे गावातील मोकळ्या जागा संपत चालल्या असून येवती येथील महिला मंडळाच्या अनोख्या उपक्रमातून गावात सुंदर तुकाराम धाम गावातील सर्वासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना ग्रामस्थांची आहे.