नागपूर शहरातील मानाचा गणपती असलेल्या तुळशीबाग येथील नागपूरच्या राजाचे ढोल ताशांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरया जयघोष करत दोन दिवस आधी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. मंडळाचे यंदाचं २७ वे वर्ष असून यावेळी मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गडचिरोली : महिलेचा बळी घेणारी टी १४ वाघीण जेरबंद, फरी जंगलात होती दहशत

गणेशमूर्तीची स्थापना करण्याच्या कालावधी दोन दिवसावर येऊन ठेपला असून शहरातील विविध भागात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. लालबागच्या धर्तीवर २७ वर्षापूर्वी नागपूरच्या प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चितारओळीतून केळीबाग मार्गे तुळशीबाग येथील मंडळात वाजत-गाजत नागपूरच्या “राजा’चे धूमधडाक्‍यात आगमन झाले. मंगळवारी विधिवत पूजा करुन नागपूरच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सोमवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारपेठ आणि चितारओळ गर्दीने फुलली आहे. शहरातील विविध भागातील सार्वजनिक मंडळामध्ये गणरात्च्या आगमनासाठी मंडप आणि सजावट केली जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi baug ganpati arrived two days earlier with great cheer vmb 67 zws