गोंदिया : गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामन्याच्या जेवणाच्या ताटावर करडी नजर पडली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी चटक टोमॅटोची चढलेली लाली आता ओसरली असून जेवणातील डाळींचे दर वाढले आहेत. आज गोंदिया बाजारात तूर डाळ प्रतिकिलो १७५ रुपयांपर्यंत दर झाल्याचे कळले. यामुळे सर्वसमान्यांना महागाईचा फटका बसत आहे.
सरकार एकीकडे गॅस सिलिंडर स्वस्त करतात, तर दुसरीकडे इतर जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत तूर डाळीच्या दरात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. टोमॅटोने दिलासा देताच ताटातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तूर डाळीचे दर वाढल्याने ताटातून वरण गायब होते की काय अशी वेळ आली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे घर खर्चाचे बजेट कोलमडले आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीचा अर्ज आता एका क्लिकवर.. ही आहे प्रक्रिया..
आणखी दरवाढीची शक्यता
बाजारातील तूर डाळीची मागणी आणि पुरवठा यातील तफावत अद्यापही कमी झाली नसल्यामुळे तूर डाळीचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. असे व्यापारी अविनाश आहुजा यांनी सांगितले.
हेही वाचा – नागपूर: आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे निधन
मागील ९ महिन्यांतील दरवाढ
जानेवारी – १०८ – ११०
फेब्रुवारी – ११२ – ११५
मार्च – १२० – १२२
एप्रिल १२३ – १२५
मई – १२६ – १३०
जून – १३५ – १३८
जुलै १३८ – १४०
ऑगस्ट १४५ – १५०
सप्टेबर १७० – १७५
(दर प्रति किलो)