बुलढाणा: मागील वर्षी जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या ‘लम्पी’चा यंदा पुन्हा प्रादुर्भाव झाला आहे.यंदा तीव्रता कमी असली तरी आजअखेर दोघा जनावरांचा मृत्यू झाला असून ५६ जनावरे बाधित झाली आहे.सध्या जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २७ गावांत या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

मेहकर , लोणार देऊळगाव राजा, चिखली, मलकापूर, सिंदखेडराजा, मोताळा, मलकापूर नांदुरा या तालुक्यातील २७ गावांत प्रसार झाला आहे. या तुलनेत बुलढाणा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद या तालुक्यात रोगाने अजून प्रवेश केला नसल्याचे पशु संवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. विभागाने यंदा लसीकरण वर जोर दिला असून आजअखेर १० हजारांवर जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Story img Loader