औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) भारतीय स्टेट बँकेचे लॉकर तोडून १४ लाखांचा धाडसी दरोडा प्रकरणी पोलिसांनी चुलत भाऊ असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे तपासकार्यात व्यत्यय नको म्हणून गुप्त ठेवण्यात आली आहेत. सीसीटीव्ही डीव्हीआरसोबत घेऊन गेलेले चोरटे चारचाकी वाहनावरील एका वाक्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
हेही वाचा- अकोला : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी
चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील एमआयडीसीतील भारतीय स्टेट बँकेत गत आठवड्यात शनिवार व रविवार अशा सलग दोन सुट्या बघून दरोडेखांरांनी दरोडा घातला. सोमवारी सकाळी बॅंक पूर्ववत सुरु होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांना बँकेच्या आतील लॉकर तोडलेले दिसले. चोरट्यांनी अनेक दिवसांपासून या बॅंकेवर पाळत ठेवली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोड्याची घटना येणार नाही, याची काळजी या चोरट्यांनी घेतली. त्यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे लागले आहे, याची इंत्यभूत माहिती चोरट्यांना होती. त्यामुळे बॅंक परिसरात प्रवेश करताच आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या द्रव्याची फवारणी केली. खिडकी तोडून आत गेले. गॅस कटरने लॉकर तोडले. या गडबडीत लॉकरमधील काही नोटासुद्धा जळाल्या. बॅंकेतील सुरक्षा यंत्रणा आधी बंद केली. त्यामुळे लॉकर सहजरित्या त्यांनी गॅस कटरने कापले. त्यातील चौदा लाख रुपये घेऊन ते पसार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज संग्रहीत यंत्रणाही स्वतःसोबत घेऊन गेले.
हेही वाचा- भंडारा: मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, दहावीच्या विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू
कोणताही सबळ पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. त्यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर चार दिवसानंतर दोन आरोपी पोलिसांना लागले. ते चंद्रपूर शहरातीलच असल्याचे समजते. मात्र त्यांच्या नावाबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. यात बॅंक फोडी प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. चोरट्यांनी बॅंक फोडली. तिथली सुरक्षा यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली. बॅंकेतील सीसीटीव्ही आणि डिव्हीआर सुद्धा पैशासोबत घेवून गेले. त्यामुळे पोलिसांच्या हाती लागणार नाही, असा विश्वास चोरट्यांना होता. परंतु या बॅंक परिसरातील मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. याची कल्पना चोरट्यांना नव्हती. नेमकी तिथेच चूक झाली.
हेही वाचा- चंद्रपूर: वाघ जुमाणेना…. गुराखी ठार, गोठ्यात शिरून बैलाचाही घेतला घास!
पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा घटना घडल्यानंतर एक संशयास्पद वाहन या मार्गाने रात्री वारंवार गेल्याचे दिसून आले. या चारचाकी वाहनावर समोरच्या काचावर एक वाक्य लिहीले होते. हेच वाक्य पोलिसांना आरोपीपर्यंत घेवून गेले. या वाहनाचा पोलिसांनी शोध घेतला आणि पहिला आरोपी हाती लागला. त्यानंतर दुसऱ्याला अटक केली. पहिला अटकेतील आरोपी या वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. दोन्ही अटकेतील आरोपी चुलत भाऊ आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली.