बुलढाणा : जिल्ह्यातील सातपैकी दोन विधानसभा मतदारसंघाला यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमाने नवीन नेतृत्व लाभले आहे. तब्बल ३० वर्षांनंतर हे परिवर्तन झाले. आता हे नवीन चेहरे किती वर्षे या मतदारसंघाची धुरा सांभाळतात हा भावी राजकारणाच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघातील गत वेळचे आमदार संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले (भारतीय जनता पार्टी) , संजय गायकवाड (शिवसेना शिंदे गट) हे पुन्हा निवडून आले आहे. आमदार गायकवाड, महाले हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले तर फुंडकर यांनी आमदारकीची हॅट ट्रिक केली आहे. मलकापूर मध्ये बदल झाला असून आमदार राजेश एकडे हे पराभूत झाले आहे. मात्र तिथे निवडून आलेले भाजपचे नूतन आमदार चैनसुख संचेती हे यापूर्वी १९९५ ते २०१४ पर्यंत आमदार राहिले आहे. २०१९ मध्ये पराभूत झाल्यावर त्यांनी २०२४ मध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे मलकापूर ची धुरा पुन्हा संचेती यांच्याकडे आली आहे एवढेच.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाणीचा इशारा आणि देवळीत इतिहास घडला…

शिंगणे, जाधवांची सद्दी संपली!

या तुलनेत मेहकर आणि सिंदखेडराजा मतदारसंघाला मात्र नवीन कोरे नेतृत्व मिळाले आहे. प्रशासनातून स्वेच्छा निवृत्ती घेत राजकारणात आलेले सिद्धार्थ खरात हे मेहकरचे आमदार झाले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय रायमूलकर यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले आहे. विध्यमान केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव हे यापूर्वी १९९५ ते २००४ दरम्यान मेहकरचे आमदार राहिले आहे. त्यांनी राज्य मंत्री मंडळात मंत्री पद भूषविले आहे. २००९ मध्ये मेहकर मतदारसंघ राखीव झाल्यावर संजय रायमूलकर हे २०१९ पर्यंत आमदार राहिले. शिवसेनेच्या या नेत्यांनी सहा दशके मेहकर वर अधिराज्य गाजविले. मात्र यंदा मेहकरला सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने ३ दशकानंतर नवीन नेतृत्व मिळाले आहे.

हेही वाचा…‘मुख्यमंत्री एकच…’ शिंदेंच्याफलकांमुळे महायुतीतील छुपा संघर्ष आता…

सिंदखेडराजा मतदारसंघाचे राजकीय चित्र असेच राहिले. १९९५ च्या लढतीत अपक्ष म्हणून लढणारे राजेंद्र शिंगणे हे आमदार झाले. त्यानंतर सलग चार टर्म ते आमदार राहिले .२०१४ च्या निवडणुकीत ते लढले नाही ,त्यामुळे त्यांचे पारंपारीक प्रतिस्पर्धी शशिकांत खेडेकर यांना आमदारकीची संधी मिळाली. मात्र २०१९ च्या लढतीत शिंगणे परत आमदार झाले. या दरम्यान ते राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री राहिले. त्यांनी तीस वर्षे मातृतीर्थावर राज्य केले. मात्र २०२४ ची निवडणूक त्यांचा पहिला पराभव घडविणारी ठरली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणाऱ्या शिंगणेंना अजितदादा गटाचे मनोज कायंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सिंदखेडराजा मध्ये तीस वर्षांनंतर बदल झाला असून कायंदे हे सिंदखेडराजा चे नेतृत्व करणार आहे.

Story img Loader