बुलढाणा : खामगाव शहरात दोन बंगल्यात दरोडा पडला. सहा सदस्यीय दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले असले तरी ऐवज कितीचा लंपास झाला ते स्पष्ट झाले नाही. कारण दोन्ही घरमालक परगावी गेले असून ते परतल्यावरच नेमकी रक्कम कळणार आहे.
आदर्श नगर भागात आज शनिवारी उत्तररात्री सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. हे सहा सशस्त्र दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या टोळीने दोन बंगल्यात दरवाजे तोडून प्रवेश केला. अनेक तासांनंतरही दरोड्याची रक्कम किती याचा शोध घेण्यात येत आहे. घरमालक खामगावात आल्यावरच याचा उलगडा होईल.