बुलढाणा:  सध्या आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची धूम आहे.  बुलढाणा जिल्ह्यातही  क्रिकेटचा माहोल तयार झाला आहे. मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात आहे.  खामगाव व चिखली शहर यासाठी (कु) प्रसिद्ध आहे.  स्थानिक गुन्हे शाखा आणि बुलढाणा शहर पोलिसांनी एका संयुक्त  कारवाईत बुलढाणा शहरात दोघांना आय पी एल सामन्या वर जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ४२ हजार रूपये किंमतीचा मुद्धे माल जप्त केला आहे.

 बुलढाणा शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  बुलढाणा शहरातील संभाजीनगर भागात  रविवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. दोघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक अशोक लांडे  यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली  आहे. तेरा एप्रिल रोजी रात्री उशिरा बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील जगदीश भोसले, रवी भोसले हे घरात जुगार खेळत होते. आयपीएल च्या हार विजयावर वर अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून  ३२ इंच एलईडी टीव्ही १५ हजार, दोन मोबाईल २७ हजार रुपये,  असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जगदीश भोसले, रवी भोसले रा.संभाजीनगर, बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या वर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस उप निरीक्षक  पंकज सपकाळे, पोलीस हवालदार, दीपक लेकुरवाळे, एजाज खान, दिगंबर कपाटे,पोलीस नायक विजय पैठणे, पोलीस जमादार गजानन गोरले, दीपाली चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.