नागपूर : कोरबाहून नागपूरकडे येत असलेल्या शिवनाथ एक्सप्रेसचे दोन डबे सोमवारी पहाटे डोंगरगड (छत्तीसगड) येथे घसरले. साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना धक्का लागून किरकोळ दुखापत झाली. कोरबा इतवारी शिवनाथ एक्सप्रेस पहाटे पावणे चार वाजता डोंगरगड रेल्वे स्थानकाच्या यार्ड परिसरात इंजिनला लागून असलेले दोन डबे घसरले. त्यामुळे काही प्रवासी बर्थ वरून खाली पडले आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना त्या दोन डब्यातून खाली उतरवले आणि इतर डब्यात त्यांची व्यवस्था केली.

हेही वाचा… धावती ‘गीतांजली’अचानक थांबली!; नागपूर-गोंदिया मार्गावर प्रवासी अडकले

त्यानंतर दोन्ही डबे गाडी पासून वेगळे करण्यात आले आणि गाडी राजनांदगाव कडे सकाळी पावणे सहाच्या सुमारास रवाना करण्यात आली. तेथे या गाडीला दोन डबे जोडून त्या प्रवाशांना परत त्या दोन डब्यामध्ये बसवण्यात आले आणि ही गाडी इतवारीच्या दिशेने रवाना करण्यात आली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Story img Loader