नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपविल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. फडणवीस यांच्याविरुद्ध दोन प्रकरणे प्रलंबीत होती. परंतु, माझ्या नजरचुकीमुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रात या दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्यास राहून गेल्याची कबुली ॲड. उदय डबले यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पहायला जाणार’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कर्नाटकमध्ये उद्या…’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१४ मध्ये नागपूर विधानसभा (दक्षिण-पश्चिम) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जासोबत फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यासंदर्भात ॲड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खटला चालविण्याचे आदेश दिले होते. फडणवीस यांनी उमेदवारीची कागदपत्रे भरताना अर्ज क्रमांक २६ मध्ये २२ गुन्ह्याच्या माहितीचा उल्लेख केला होता. मात्र, २ खासगी गुन्ह्याचा उल्लेख करण्याचे सुटले होते. जेव्हा की नियमानुसार सर्व गुन्ह्यांची माहिती पुरवणे बंधनकारक होते. त्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण स्थानिक न्यायालयात, नंतर उच्च न्यायालयात, त्यानंतर सर्वोच न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण घेत हे प्रकरण न्यायदंडाधिकारी न्यायालयात वळते केले. त्यानुसार जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून ६ मे २०२३ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.

हेही वाचा >>>अमरावती : “राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रव्यापी पक्षच नाही”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका, म्हणाले…

यावेळी फडणवीस यांचे वकील डी. व्ही. चौव्हान यांच्यामार्फत साक्षीदार ॲड. उदय प्रभाकर डबले यांनी वर्ष २०१४ मध्ये आपल्याकडे देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा निवडणूक अर्ज भरण्याची जबाबदारी होती. यावेळी अर्ज क्रमांक २६ मध्ये फडणवीस यांच्यावरील २२ दाखल गुन्ह्याची माहिती भरली. मात्र, या अर्जामध्ये २ गुन्ह्यांच्या माहितीचा उल्लेख माझ्या चुकीमुळे, नजरचुकीने लक्षातून चुकल्याने सुटले. सदर बाब ही मुद्दामहून लपविली नाही. फडणवीस यांनी माझ्या सांगण्यावरुन आणि माझ्यावर विश्वास ठेवून निवडणूक प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे. माझा किंवा फडणवीस यांचा दोन गुन्हे लपविण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असे ॲड. उदय डबले यांनी म्हटले आहे. मात्र, डबले यांच्या साक्षीने प्रकरणाला नवीन वळण आले असून यामध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सतीश उकेतर्फे ॲड. तरुण परमार यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी ७ जून २०२३ रोजी होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two crimes hide by dcm devendra fadnavis in 2014 assembly poll affidavit submitted to election commission dag 87 zws
Show comments