लोकसत्ता टीम

बुलढाणा : तमाशाचा फड उभारताना लोखंडी पाईपचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तमाशा संचातील दोघांचा मृत्यू झाला. मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात भरणाऱ्या कान्हूसती मातेच्या यात्रेत बुधवारी ही दुर्घटना घडली.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक

आणखी वाचा-आकाशात विविध नजाऱ्यांची उधळण, मनमोहक कार्तिक सोहळ्याची पर्वणी

आज ही यात्रा सुरु झाली. यात्रेत तमाशाचे फड राहतात. जळगाव येथील आनंद लोकनाट्य मंडळातील कामगार तमाशाचा फड उभा करीत होते. दरम्यान, हातातील लोखंडी पाइपाच विद्युत तारेला स्पर्श झाला. यामध्ये जोराचा धक्का लागून अंकुश भारुडे, विशाल भोसले या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अंकुश भारुडे हे मूळचे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील तर विशाल भोसले हे राजुर गणपती( जालना) येथील राहिवासी होत. यात्रेनिमित्त गावोगावी, तसेच आयोजित ठिकाणी तमाशाचे फड उभारण्याचे काम ते मागील कित्येक वर्षांपासून करीत होते. घटनास्थळी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.