वाशीम : एकीकडे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे पक्ष वाढीसाठी जिवाचे रान करीत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील आयोजित सभेतून एकीचे आवाहन करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र, जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटामध्ये जिल्हा प्रमुख पदावरून अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्या समक्ष हा प्रकार घडला असून या बैठकीत एक गट हजर होता तर दुसरा गट बैठकीला न जाता बाहेर प्रतीक्षेत होता.

हेही वाचा – चंद्रपूर : जिल्हाधिकाऱ्यांचा दारूची दुकाने बंदचा आदेश न्यायालयाकडून रद्द; आंबेडकर जयंतीदिनी जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू

राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून चाळीस आमदार आणि काही खासदारासह वेगळा गट तयार करून भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राज्यात शिवसेनेला खिंडार पडले असले तरी पडतीच्या काळात मात्र वाशीम जिल्ह्यात शिवसेना एकसंध उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती. शिवसेनेच्या नेत्या खासदार भावना गवळी उद्धव ठाकरे यांच्या सेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाल्यानंतर जिल्ह्यातील ठाकरे गट तत्कालीन जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात एकसंध होता.

परंतु मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख पदावरून वाद उफाळून आल्याने जिल्ह्यात एकसंध असलेल्या ठाकरे गटाचे दोन गट पडले. ठाकरे गटातील वाढती दुफळी रोखण्यासाठी खासदार अरविंद सावंत आज वाशीम येथे आले होते. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापरी व काही तालुकाप्रमुख आणि शहर प्रमुख बैठकीला उपस्थित न राहता बैठक कक्षा बाहेर प्रतीक्षेत होते. शिवसेना नेते खुद खासदार अरविंद सावंत यांच्यासमोरच हा प्रकार घडला. जिल्ह्यात होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटातील तत्कालीन जिल्हा प्रमुख सुरेश मापारी व सध्याचे जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कवर यांचा गट यांनी वेगळ्या गटाशी युती केल्याने एकसंध उद्धव ठाकरे गटातील बंडाळी वाढतच चालली असल्याने आगामी निवडणुकीत मोठा फटाका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा – मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर; क्रांतीभूमी चिमूरमध्ये माजी मंत्री वडेट्टीवार आक्रमक

महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्या, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी १३ मार्च रोजी रिसोड येथील जाहीर सभेत केली होती. मात्र वज्रमुठीला भेगा पडल्या का, हे ठोसा बसल्यावर कळेल, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two factions of the thackeray group in front of mp arvind sawant in washim pbk 85 ssb
Show comments