नागपूर : विवाहित प्रेमीयुगुलांनी आपापल्या संसाराचा आणि कुटुंबाच्या बदनामीचा विचार न करता नागपुरातून थेट विमानाने विदेशात पलायन केले. दोघांच्याही कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला असून विवाहित प्रेमी युगुलांमुळे दोघांचेही संसार विस्कळीत झाले आहेत. वाठोडा पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज (४०) आणि सीमरन (३२, काल्पनिक नाव) हे दोघेही १५ वर्षांपूर्वी कळमेश्वरमधील एका औषधीच्या कंपनीत नोकरीवर होते. राजचे वडिल बँकेतून निवृत्त तर आई शिक्षिका होती. एकुलता असलेल्या राजने फार्मसीमध्ये शिक्षण पूर्ण केले. राज आणि सीमरन हे नोकरीवर असताना दोघांत मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनंतर दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. सीमरनने आईशी चर्चा केली असता तिने आंतरधर्मीय विवाहास नकार दिला. तिने कुटुंबियांना माहिती देऊन सीमरनचे लग्न आटोपण्यास सांगितले. राजने तिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने कुटुंबियाच्या बदनामीचा विचार करता तिने नकार दिला. त्यानंतर अभियंता असलेल्या नातेवाईक युवकासोबत सीमरनचे लग्न झाले. मात्र, सीमरन राजला विसरण्यास तयार नव्हती. सीमरनचे लग्न झाल्यामुळे राज नैराश्यात गेला आणि त्याने शहर सोडले. तो मुंबईतील एका मल्टीनॅशनल कंपनीत गलेलठ्ठ पगारावर नोकरीवर लागला. सीमरनच्या तो सतत संपर्कात होता. सीमरनला पाच वर्षांनंतर मुलगा झाला. मात्र राजवरील प्रेम कमी झाले नव्हते. सासरी सर्व काही सुरळीत सुरु असताना सीमरनने राजशी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – महाराष्ट्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना काय? जाणून घ्या…

दोन्ही कुटुंब संभ्रमात

राजची पत्नी ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियातील आहे. त्याचे सीमरनवर अतोनात प्रेम असल्यामुळे तो पत्नीकडे नेहमी दुर्लक्ष करायचा. मुंबईला नोकरीसाठी तो एकटा राहत होता. दुसरीकडे सीमरन राजच्या प्रेमात ठार वेडी झाली होती. तिने राजसोबत संसार थाटण्यासाठी दीड वर्षांच्या मुलासह पलायन करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही या निर्णयामुळे सीमरनचा पती आणि राजच्या पत्नीला धक्का बसला. या निर्णयामुळे दोघांचाही संसार उद्धवस्त झाला आहे.

हेही वाचा – सलग २०० दिवस कार्यरत राहून वीज निर्मिती, १४ वर्षानंतर चंद्रपूर वीज केंद्रात विक्रम

विदेशात काढला पळ

राज आणि सीमरनने पळून जाण्याचा बेत आखला. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून नियोजन सुरु केले. सुरुवातीला कंपनीत नोकरीसाठी अर्ज करण्याच्या नावावर सीमरनने स्वतःचा पासपोर्ट तयार केला. त्यानंतर पतीच्या लपून एक वर्षीय मुलाचाही काही दिवसांपूर्वीच पासपोर्ट तयार केला. राजने सीमरनला विमानतळावर बोलावले. दोघेही विमानाने मुंबईला गेले. मुंबईतून थेट दोघांनीही विदेशात पळ काढला. वाठोडा पोलीस आता या प्रकरणात दोघांचाही शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार भावना धुमाळ यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two family destroyed because of the loving couple both of them fled abroad adk 83 ssb