लोकसत्ता टीम

अकोला : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यामध्ये वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

जिल्ह्यात यंदा उन्हाचा पारा चांगलाच चढला होता. गेल्या दोन-तीन दिवसापासून उन्ह व सावलीचा खेळ सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासापर्यंत पावसाचा जोर कायम होता. सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा पारा चढला होता. दिवसभर उन्ह चांगलेच तापल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशीरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता.

आणखी वाचा-विठ्ठल दर्शनाला जाण्यासाठी एसटीची विशेष सेवा, ५ हजार बसेस..

दरम्यान, जिल्ह्यामध्ये वीज पडून दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (२६) हे शेतात मृत अवस्थेत आढळून आले. वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या घटनेत मूर्तिजापूर तालुक्यातील टीपराळा येथील शालिग्राम श्रीराम डोंगरे (६५) हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना सायंकाळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे. प्रशासनाकडून दोन्ही घटनांचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात ११ ते १६ जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत काळजी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी केले आहे.

आणखी वाचा-अखेर ‘एमपीएससी’कडून समाजकल्याणच्या परीक्षेची तारीख जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

जिल्ह्यातील वीज पुरवठा विस्कळीत

शहरासह जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सोबतच वादळी वारा असल्याने अनेक भागातील वृक्ष उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वीज यंत्रणा प्रभावित झाली. जिल्ह्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. काल रात्रीपासूनच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. अनेक भागांमध्ये रात्रभर वीज पुरवठा नव्हता. दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा दुपारच्या सुमारास सुरळीत झाला. मात्र, पुन्हा एकदा सायंकाळपासून वादळी वारा व पाऊस सुरू झाल्याने विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धस्तरावर काम केले जात आहे.