बुलढाणा: सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेस गोवा येथे आयोजित एफसीबीए सोहळ्यात ‘बेस्ट ऑडिट प्रॅक्टिस’ आणि ‘बेस्ट आयटी हेड ऑफ द इयर’ या दोन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – गडचिरोली : मेडीगड्डा धरणावरून राजकीय वातावरण तापले, पुलाला तडे गेल्याने सीमाभागात धोक्याचा इशारा

हेही वाचा – नागपूर : …म्हणून दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता होते बुद्ध वंदना, ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत बँकेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा बँक ही आर्थिक अडचणीत आली होती. मात्र अशोक खरात यांनी योग्य नियोजन करून बँकेला पूर्वपदावर आणले आहे. यामुळे जिल्हा सहकारी बँकेने या वर्षासाठी ५ वर्गवारीसाठी नामांकने दाखल केली होती. बँक दोन पुरस्कारांची मानकरी ठरली. गोवा येथे आयोजित राष्ट्रीय सहकार परिषदेत गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर आणि रिझर्व बँकेचे माजी वरिष्ठ अधिकारी रत्नाकर देवळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two fcba awards to buldana district bank honored in the national cooperative council scm 61 ssb