रविवारी सुटी असल्यामुळे दाताळा येथे इरई नदीच्या पात्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या रोहन बोबाटे (१७) व गौरव वांढरे या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी उघडकीस आली. जिल्हा क्रीडांगण जवळीक लोकमान्य टिळक विद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या या दोन मित्रांनी घरच्यांना न सांगता नदीत पोहायला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार दुपारी ते नदीवर गेले.
हेही वाचा >>> अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आग; धुरामुळे चिमुकल्यांची प्रकृती गंभीर
नदी काठावर कपडे काढून आंघोळीसाठी पाण्यात उतरले. नदीला भरपूर पाणी असल्याने तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला. यातील एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. दोघेही दाताळा येथील राहणारे होते.