लोकसत्ता टीम

भंडारा: दोन दिवसांपूर्वीच लाखांदूर तालुक्यातील एका तरुणाला गांजा विक्री करताना अटक झाल्यानंतर आता पुन्हा तालुक्यातील दोघांना पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणात जेरबंद केले आहे. दुचाकीने आलेल्या दोन युवकांकडून गांजा तस्करी होत असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे भंडारा पोलीसांनी सापळा रचून शुक्रवारी रात्री स्मशानभूमी परिसरात अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजाही जप्त करण्यात आला.

लाखांदूर तालुक्यातील येथील महेश ठवरे, वय २८ रा. अंतरगाव / चिचोली, ता. लाखांदूर) आणि प्रणय मेश्राम (१९, इंदोरा, ता. लाखांदूर) अशी या युवकांची नावे आहेत. गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीसांना शुक्रवारी दुपारीच मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला होता. रात्री उशिरा स्मशानभूमी परिसरात भंडारा पोलिसाना त्यांना गांजासह रंगेहाथ पकडले. सुपारे ६० हजार रुपये किंमतीचा ६ किलो गांजा आणि दुचाकी (एमएच ३६, एव्ही १३१७) असा १ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या दोघांवरही विविध कलमांखाली गुन्हे नोंदवून अटक केली आहे.

आणखी वाचा-नागपूर : माजी पोलीस अधिकारी कैद्याचा आकस्मिक मृत्यू

लाखांदुरातील युवकावर सलग दुसरी कारवाई…

दरम्यान मागील दोन तीन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील गवराला येथील एका युवकास गांजा विकताना पुणे पोलीसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेला दोन दिवस लोटत नाही तोच पुन्हा एकदा लाखांदूर तालुक्यातील दोन युवकांना गांजा तस्करी करतांना भंडारा पोलिसांनी अटक केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.