संपूर्ण राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची तयारीची लगबग सुरु असतानाच दोन कर्मचाऱ्यांनी लाच घेण्याची तयारी दर्शविली. संपाच्या तयारीच्या पूर्व संध्येलाच म्हणजे सोमवारी दोन शासकीय कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सावनेरच्या नगरपरिषद कार्यालयात मोठी धावपळ झाली. सचिन विठ्ठलराव पडलवार (३१, सावनेर) आणि शेखर गोविंदरावजी धांडोळे (३४) अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वर्धा : संपकरी आक्रमक; ‘‘संप दडपण्याची भाषा म्हणजे…”

सावनेरमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय तक्रारदाराने पत्नीच्या नावाने भूखंड घेतला होता. त्या भूखंडाची नगरपरिषदेतून गुंठेवारी काढायची होती. त्यासाठी तक्रारदाराने नगरपरिषद कार्यालयात रितसर अर्ज केला होता. मात्र, त्या अर्जावर दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे त्यांनी सावनर नगरपरिषदेच्या संगणक परिचालक शेखर गोविंदराव धांडोळे याची भेट घेतली. त्याने अर्जाची दखल घेण्यासाठी कर व प्रशासकीय अधिकारी प्रभारी नगर रचना सहायक सचिन पडलवार यांची भेट घेण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी पडलवार यांची भेट घेतली. त्यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास भूखंडाची गुंठेवारी काढण्याचे काम करण्यास नकार दिला.

हेही वाचा >>> चंद्रपूर: कोल माफियांची गुंडागर्दी, बंदूक डोक्याला लावून तीन ट्रक कोळसा चोरला

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल माकणीकर यांची भेट घेऊन तक्रार दिली. तक्रारीवरून उपाधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी तक्रारीची शहानिशा केली. १३ मार्चला लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शविण्यात आली. सचिन पडलवार यांनी लाचेची रक्कम शेखर धांडोळे यांच्याकडे देण्यास सांगितले. लाच स्विकारताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी शेखरला अटक केली आणि सचिन पडलवार यालाही ताब्यात घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two government employees arrested for accepting rs 20 thousand bride one day before of strike adk 83 zws