नागपूर : नागपूरचे अनेक नागरिक नोकरी, शिक्षणासह इतर कामासाठी मुंबई, पूणेसह राज्यातील वेगवेगळ्या भागात राहतात. तर हैद्राबादसह इतरही राज्यातही नागपुरातील अनेक जण राहतात. दिवाळीच्या सनान घरात कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी ते रेल्वेसह एसटी बसनेही प्रवास करतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात राज्यसह देशभरातील रेल्वेसह एसटी बसेस हाऊसफुल्ल असतात.

दरम्यान रेल्वे- एसटी बसमध्ये जागा मिळत नसल्याने हजारो प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या भागात प्रवास करावा लागतो. प्रवशांची गरज लक्षात घेऊन ट्रॅव्हल्स कंपन्या भरघोस दरवाढ करतात. परंतु, अशा दरवाढीविरुद्ध तक्रारीसाठी परिवहन खात्याने दिलेले (०२२) ६२४२६६६६ आणि १८००२२०११० हे दोन मदत क्रमांक सध्या बंद असल्याचा आरोप, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, लीलाधर लोहरे आणि प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मुकेवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. त्यावर प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी मनोज ओतारी यांनी ग्राहक पंचायतला सांगितले की, ट्रॅव्हल्स कंपन्यांना भाडेवाढ मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई सुरू आहे. याप्रसंगी श्यामकांत पात्रीकर, लीलाधर लोहरे, नितीन मुकेवार यांच्यासोबत डॉ. बिप्लब मजुमदार, मुकुंद अडेवार, आनंद लुतडे, प्रशांत लांजेवार, श्रीराम सातपुते उपस्थित होते.

हेही वाचा…‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; ‘दाना’ चक्रीवादळ मध्यरात्रीनंतर…

u

दिवाळीच्या तोंडावर एकीकडे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरू झाली असतानाच या दरवाढीविरोधात तक्रारीसाठी परिवहन खात्याने सुरू केलेला मदत क्रमांक बंद आहे. ग्राहक पंचायत, महाराष्ट्रने ही बाब उघड केली आहे. त्यामुळे राज्यातील ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा वाली कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

प्रकरण काय?

वाहतूक विभागातर्फे २१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान अवैघ ट्रॅव्हल्स विरोधात विशेष अभियान राबवले जात आहे. त्यानंतरही पुणे, नाशिक, हैदराबाद या मार्गावर ३०० टक्के अधिक म्हणजे एक हजार ऐवजी ३ हजार रुपये दर आकारत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत ग्राहक पंचायतकडे तक्रारी आल्या. त्यांनी आवाज उचलल्यावर हा प्रकार पुढे आला.

हेही वाचा…गोंदिया: राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली, ‘या’ विद्यमान आमदारांचा थेट तिसऱ्या आघाडीत प्रवेश

असे वाढले तिकीट दर…

नागपूर ते पुणे ट्रॅव्हल्सचे बुधवारचे भाडे ७६० ते १००० रुपये, तर दिवाळीनंतर – म्हणजे २ नोव्हेंबर नंतर – हेच भाडे ३३०० ते ४००० रुपये आहे. सध्या बस भाडे पुणे नॉन एसी स्लीपर १५९५ रुपये, शिवशाही एसी स्लीपर १६०५, हिरकणी १४९५, तर हैदराबाद साधारण बस ७४५, शिवशाही एसी ११७५ आहे, असे नितीन मुकेवार यांनी सांगितले.