बुलढाणा: घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत दोन घरे जळाली. मात्र यावेळी घरात झोपलेले चार महिन्यांचे बाळ बचावले. देव तारी त्याला कोण मारीचा सुखद प्रत्यय आणणारी ही घटना खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथे आज शनिवारी (दि २०) घडली.

हेही वाचा – पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….

हेही वाचा – उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…

एका घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यामुळे आगीचा भडका उडाला. पाहतापाहता ही आग पसरल्याने कुडाची घरे व त्यातील साहित्य क्षतीग्रस्त झाले. मात्र छताला साडी बांधून केलेल्या झोक्यात झोपलेले चार महिन्याचे बाळ मात्र साफ बचावले! खामगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दल व गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी धावत आलेल्या आई व इतर नातेवाईकांना तान्हुले सुखरूप असल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

Story img Loader