बुलढाणा-खामगाव मार्गावरील बोथा घाटात झालेल्या दुचाकी व एसटी बसच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज, रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.मोर्शी (जि. अमरावती) येथून बुलढाण्याकडे येत असलेली (एम एच.४०.वाय.५७४० क्रमांकाची) एसटी बस व खामगावकडे जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
हेही वाचा >>>बुलढाणा : अजब चोरीची गजब कथा! वाहन गुजरातचे, चोरले उत्तरप्रदेशमधील चोरट्याने अन् पकडले खामगाव पोलिसांनी
यात गजानन एकनाथ शेळके (रा. बुलडाणा) यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात जखमी झालेला त्यांचा सहकारी प्रकाश तोताराम जाधव (रा. कोलवड, ता. बुलढाणा) यांचा खासगी रुग्णलयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेळके हे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कक्षसेवक म्हणून कार्यरत होते. अपघाताची माहिती मिळाताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.