भंडारा : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास पाथरी येथे घडली. मनिषा भारत पुष्पतोडे (२५) आणि प्रमोद नागपुरे (४५) असे मृतकांची नावे असून दोघेही पाथरी येथील रहिवासी आहेत.हमामान विभागाने आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान आज सकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र सध्या शेतीची कामे असल्याने शेतमजुरांची लगबग सुरू होती. तुमसर तालुक्यातील पाथरी येथे दुपारच्या सुमारास शेतावर काम करीत असताना वीज कोसळून एका महिलेचा आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.