नागपूर: अमरावती मार्गावर ट्रकचालकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे नागपूरकडे येणाऱ्या तसेच नागपूरहून अमरावतीकडे जाणारी वाहने अडकून पडली असून दोन कि.मी.च्या रांगा लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हिट ॲण्ड रन’ च्या संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला विरोध म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी नागपूरसह देशभरात रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. नागपूरमध्ये अमरावतीकडे जाणाऱ्या महामार्गावर हे आंदोलन सुरू आहे. दोन्ही बाजूंनी दोन-दोन कि.मी. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात एस.टीचा समावेश आहे.

हेही वाचा – गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात, हजारो भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन; संतनगरी शेगावात तीन दिवस…

हेही वाचा – वर्धा : एक ग्लास दारूचा नव्हे, एक ग्लास दुधाचा; चला व्यसनास बदनाम करू या… कोण म्हणतंय असं? वाचा…

प्रवाशांचे हाल होत आहे. भंडारा जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पारडी येथे आंदोलन सुरू असून तेथेही अशाच प्रकारची स्थिती आहे. अनेक प्रवाशांनी एस.टी.मधून उतरून इतर वाहनांचा पर्याय शोधने सुरू केले आहे. रस्ता रोकोमुळे पेट्रोलपंपाकडे दुचाकीस्वारांना किंवा अन्य वाहनांना जाता येत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two km of vehicles queue in nagpur due to agitation of truck drivers mnb 82 ssb
Show comments