लोकसत्ता टीम
वाशीम: वाशीम जिल्ह्यातील कोळंबी वन परीक्षेत्रात दोन बिबट्याची पिल्ले आढळून आलीत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या वतीने त्यांचा शोध घेतला जात आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी वनपरिक्षेत्रात २३ एप्रिल रोजी दोन बिबट्याची बछडे कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांच्या सावलीत विसावा घेत असल्याचे दिसून आले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने ते पाण्याच्या शोधत असावे, असा कयास लावला जात आहे.
हेही वाचा… बुलढाणा : नवीन महागडी कार पेट्रोल टाकून पेटवून दिली, ‘सीसीटीव्ही’त कैद झाला थरार
या घटनेची माहिती कळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु तोपर्यंत ते निघून गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे.