नागपूर : सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका महिलेने देहव्यापारात ढकलले. आंबटशौकीन ग्राहकांना बोलावून घरातच देहव्यापाराचा अड्डा सुरु केला. गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून महिलेला अटक केली तर दोन्ही मुलींना पोलिसांनी देहव्यापाराच्या दलदलीतून बाहेर काढले. या प्रकरणात आरोपी दलाल महिलेला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ७ हजार रुपये दंड ठोठावला. मुन्नीबाई असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे.

मुन्नीबाई ही ताजनगरमध्ये राहत असून देहव्यापारात सक्रिय होती. तिने १४ वर्षीय नात मिष्ठी आणि तिची वर्गमैत्रिण स्विटी (दोघींचेही बदलेले नाव) यांना देहव्यापाराच्या दलदलीत ओढले होते. सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोघीही मुन्नीबाईच्या घरी अभ्यास करायच्या. मुन्नीबाईने सुरुवातीला दोघींनाही नवीन कपडे घेऊन दिले. पहिल्यांदा स्विटीला ५०० रुपये देऊन एका आंबटशौकीन युवकाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यानंतर मुन्नीबाई स्विटी आणि मिष्टी या दोघींसाठी ग्राहक शोधायची आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायची. मुन्नीबाई ही नेहमी ५०० रुपये देत असल्यामुळे स्विटीसुद्धा झटपट पैसे कमविण्याच्या नादात मुन्नीबाईच्या जाळ्यात अडकली.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
Women Worli agitation toilets, Mumbai,
मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही
Woman in Andhra orders appliances and receives dead body with a letter demanding1 crore 3 lakh
भयानक! महिलेने ऑनलाईन मागवलं घरगुती सामान; मात्र बॉक्स उघडताच समोर व्यक्तीचा मृतदेह अन् १.३ कोटींचे खंडणी पत्र
shocking video
अरे देवा! दुसऱ्याच्या घरातील फुलाची कुंडी चोरताना दिसली महिला, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कसे लोक आहेत..”
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Nagpur , Female Trial Room Male Staff,
नागपूर : कपडे बदलत असताना महिलांच्या ‘ट्रायल रुम’मध्ये पुरुष कर्मचारी

हेही वाचा…नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ‘नवा गडी नवा राज’

त्यामुळे मुन्नीबाई दररोज ग्राहक बोलावायला लागली. या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या तत्कालिन पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवला आणि छापा टाकण्याची तयारी केली. बनावट ग्राहकाने मुन्नीबाईची भेट घेऊन ७ हजार रुपयांत सौदा केला. त्यानंतर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली तर मुन्नीबाईला अटक करण्यात आली. या प्रकरणात अजनीचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अॅड. आसावरी परसोडकर यांनी या प्रकरणात सक्षमपणे बाजू मांडली. न्यायधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी मुन्नीबाईवर दोष सिद्ध झाल्याने २० वर्षे सश्रम कारावास आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा…नागपूर : सरस्वती शाळेच्या बसचा भीषण अपघात, एक विद्यार्थी ठार, ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी

विवाहित मुलगी प्रियकरासोबत पळून गेली

मुन्नीबाईची विवाहित मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे तिची मुलगी मिष्ठी मुन्नीबाईच्या घरी राहत होती. तसेच तिची वर्गमैत्रिण स्विटीची आईसुद्धा प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे ती दारुड्या वडिलासोबत राहत होती. स्विटीचे वडिल बेरोजगार असल्यामुळे शाळेचे शुल्कसुद्धा भरत नव्हते. त्यात मुन्नीबाईने तिला दररोज ५०० रुपये पैसे देऊन जाळ्यात अडकवले होते. म्हणून दोन्ही मुली देहव्यापाराच्या दलदलीत अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader